पार्ले टिळक विद्यालयाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्ले टिळक विद्यालयाची बाजी
पार्ले टिळक विद्यालयाची बाजी

पार्ले टिळक विद्यालयाची बाजी

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : महाराष्ट्र आर्म्सस्पोर्ट्स असोसिएशनद्वारे आयोजित राज्यस्तरीय आर्म्सस्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबई विभागाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात पार्ले टिळक विद्यालयालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले; तर औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्हा द्वितीय, कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरला आहे. शनिवारी (ता. ४) विलेपार्लेतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातून २५ जिल्ह्यातील ३०० हुन अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्‍घाटन महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष जय गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आर्म्सस्पोर्ट्स फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष बिमल चंदा, राष्ट्रीय सचिव सुमित सुशीलन आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्र आर्मस्पोर्ट्स असोसिएशन कमिटीचे सचिव अरविंद चव्हाण, राजेश गाडगे, रितेश दाभोलकर, विभावली सापळे, गीता झगडे आदींचे सहकार्य लाभले.