Sat, April 1, 2023

भिवंडीतील कोनगावात बांगलादेशी नागरिकाला अटक
भिवंडीतील कोनगावात बांगलादेशी नागरिकाला अटक
Published on : 6 February 2023, 4:08 am
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यातील कोनगावात अवैधरीत्या वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी नागरिकावर गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अबू ताहेर मोहम्मद मुफजल हुसेन (वय ४२) असे त्याचे नाव असून तो कोन गावातील पाण्याच्या टाकीजवळ राहत होता. तो मूळचा बांगलादेशमधील गाजीपूर जिल्ह्यातील बुटबाजार येथील राहणारा आहे. तो दापोडा येथील प्रीतेश कॉम्प्लेक्समधील रिबन एक्स्पोर्ट कंपनीमध्ये काम करीत होता. या घटनेची खबर नारपोली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.