दगड खाणीत ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

दगड खाणीत ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू

मनोर, ता. ६ (बातमीदार) : बोईसर पूर्वेकडील गुंदले गावातील दगड खाणीत ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. ६) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी चालकाला रुग्णालयात नेत असताना पुन्हा अपघात घडला होता.

श्यामलाल श्यामत भोई (वय २२, मूळ रा. बनेडा, राजस्थान) हा दगड खाणीत सुरुंग स्फोट करण्यासाठी ट्रॅक्टरवरील कॉम्प्रेसरच्या साह्याने ड्रिल मारण्याचे काम करत होता. गुंदले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करवेले येथील संतोष कोरडा यांच्या मालकीच्या जागेतील दगड खाणीत दगड उत्खनन सुरू आहे. ट्रॅक्टर चालक ड्रिलिंग करून खदानीतून बाहेर निघत असताना रस्त्याच्या अंदाज न आल्याने ट्रॅक्टरसह पंधरा फूट उंचावरून खदानीत पडला. खदान चालकांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टरखाली अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेतील चालकाला रुग्णालयात नेत असताना रस्त्यावरील एका वळणावर समोरून आलेल्या वाहनामुळे ट्रॅक्टर मोरीत पडून पुन्हा अपघात झाला. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com