शेअर ट्रेडिंगच्या निमित्ताने २० कोटी रुपयांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगच्या निमित्ताने २० कोटी रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : शेअर्सच्या माध्यमातून नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन मुंबईतील शेअर ट्रेडिंग कंपनीने २० कोटींची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमधील दोन व्यवसायिक आणि त्यांच्या दोन मित्रांची यात फसवणूक झाली असून, या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ट्रेडिंग कंपनीच्या संचालकाने नागपूरमधील व्यवसायिकांचे शेअर्स परस्पर विकून २० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ट्रेडिंग कंपनी चालवणाऱ्या जस्मिन शाह, दीपिका शाह आणि विशाल शाह याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर जुहू पोलिस त्यांना जवाब नोंदवण्यासाठी बोलवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिस पुढील कारवाई करणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com