Fri, June 9, 2023

घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना अटक
घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना अटक
Published on : 8 February 2023, 9:58 am
अंधेरी, ता. ८ (बातमीदार) ः घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना एमएचबी पोलिसांनी नुकतीच अटक केली. दिनेश गणपत मोरे ऊर्फ शॉन ऊर्फ बिल्डर बाऊंसर आणि विक्रांत ऊर्फ विकी शंकर कदर अशी या दोघांची नावे आहेत. दिवाळीच्या दिवशी रेकी करून घरफोडी केल्याची कबुलीच या दोघांनी पोलिसांना दिली आहे. ५१ वर्षांची तक्रारदार महिला दहिसर गावठाण परिसरात राहत असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिच्या तिन्ही मुली विवाहित असून त्या त्यांच्या सासरी राहतात. २७ ऑक्टोबरला दिवाळीमध्ये ही महिला तिच्या वसई येथील भावाकडे गेली होती. यावेळी घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी २५ हजाराच्या रकमेसह सोन्याचे विविध दागिने असा सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता.