Mon, June 5, 2023

सोगावात संत रोहिदास महाराज जयंती साजरी
सोगावात संत रोहिदास महाराज जयंती साजरी
Published on : 7 February 2023, 11:55 am
किन्हवली, ता. ७ (बातमीदार) : संत रोहिदास महाराज यांची जयंती सोगाव येथे साजरी करण्यात आली. सोगाव येथील संत रोहिदास नवतरुण मित्र मंडळाने जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित असलेल्या बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील व भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे, भरत बागराव, उपसरपंच युवराज घायवट, प्रा. जी. एच. वेखंडे, माजी सरपंच रविंद्र हिरवे आदींनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याची महती सांगितली.