ठाण्यात दासनवमी उत्सावाला सुरुवात

ठाण्यात दासनवमी उत्सावाला सुरुवात

ठाणे, ता. ७ (बातमीदार) : महाराष्ट्रातील संत कवी व समर्थ संप्रदाचे संस्थापक समर्थ रामदास यांचा समाधी दिवस संपूर्ण महाराष्ट्रात दासनवमी म्हणून साजरा केला जातो. ठाण्यात ६ फेब्रुवारीपासून दासनवमी उत्सवाला सुरवात झाली आहे. ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळाच्या वतीने सोमवारी (ता. ६) समर्थ रामदासांच्या प्रतिमेची पूजा करून प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी समर्थ रामदास मंदिरा पासून चरईतील बाळ गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये संस्थेच्या शाळेचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थेतील सभासद व ठाण्यातील नागरिकांनी सहभाग घेतला होता. तसेच सायंकाळी आजपर्यंत तीस मराठी चित्रपट, दोन हिंदी चित्रपट, दहा मराठी मालिका आणि पाच डॉक्युमेंटरीज दिग्दर्शित केलेल्या राजदत्त मायाळू या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी भक्ती मायाळू हिची एडिटिंगचा प्रवास या विषयावर मुलखात घेतण्यात आली. संस्थेच्या शैला भटवडे यांनी ही मुलखात घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com