Fri, June 2, 2023

मुंबईत टॅंकर लॉबीची
एक हजार कोटींची उलाढाल!
मुंबईत टॅंकर लॉबीची एक हजार कोटींची उलाढाल!
Published on : 7 February 2023, 3:34 am
मुंबई, ता. ७ : मुंबईतील टॅंकरमाफियांकडून पाणीविक्रीतून जवळपास एक हजार कोटींची उलाढाल सुरू आहे. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक सर्वपक्षीय राजकारणीही या पाण्याच्या गोरखधंद्यात गुंतले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. मुंबईकरांची चालवलेली ही लूट यंदाच्या अर्थसंकल्पातून थांबवता आली असती, असेही ते या वेळी म्हणाले.
मुंबईतील अनेक झोपडपट्टीत नागरिकांना पाण्यासाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागतात. हा प्रकार मुंबईत टॅंकरमाफियांकडून वर्षानुवर्षे होत आहेत. स्थानिक पातळीवरील पालिका अधिकारी आणि राजकारणी मंडळींच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोपीही जगताप यांनी केला.