पोलिस भरतीसाठी उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरतीसाठी उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी
पोलिस भरतीसाठी उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी

पोलिस भरतीसाठी उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी

sakal_logo
By

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील पुरुष उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून महिला उमेदवारांच्या शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महिला उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांच्या राहण्याची व्यवस्था आधीपासून करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तालयातील ९९६ जागांसाठी भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रक्रिया ९ फेब्रुवारीला संपणार आहेत. रविवारपर्यंत एकूण ३७ हजार ८३८ पुरुष उमेदवारांची चाचणी पूर्ण झाली आहे; तर १० फेब्रुवारीपासून महिला उमेदवारांची चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे. महिला पोलिसपदांसाठी २९७ व चालक या पदासाठी दोन जागा आहेत.
पुरुष उमेदवार भरतीच्या वेळी सुरुवातीच्या काळात उमेदवारांची राहण्याची कोणतीही सुविधा करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरतीसाठी आलेले उमेदवार रस्त्याच्या कडेला अथवा मैदानातच एका बाजूला रात्रीच्या वेळी आसरा घेत असत. यासंदर्भात प्रसारमाध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेने भरतीसाठी येणाऱ्‍या पुरुष उमेदवारांना भाईंदर पश्चिम येथील नगरभवन सभागृह तसेच राई गावातील महापालिकेचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करीन दिले होते.
आता १० फेब्रुवारीला सुरू होणाऱ्‍या महिला भरतीसाठी आधीच काळजी घेण्यात आली आहे. येणाऱ्‍या महिला उमेदवारांना महापालिकेने भाईंदर पश्चिम येथील नगरभवन सभागृह, मिरा रोड येथील प्रमोद महाजन, आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह व मीनाताई ठाकरे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना त्या ठिकाणाहून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जाण्यासाठी सवलतीच्या दरात रिक्षादेखील तैनात करण्यात येणार आहेत.