बदलापुरात ‘नो पार्किंग’खाली गाड्या पार्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरात ‘नो पार्किंग’खाली गाड्या पार्क
बदलापुरात ‘नो पार्किंग’खाली गाड्या पार्क

बदलापुरात ‘नो पार्किंग’खाली गाड्या पार्क

sakal_logo
By

बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : बदलापूर पूर्व कात्रप रोडला जाणाऱ्या वळणावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम भिंतीवर ‘नो पार्किंग’चे फलक लावण्‍यात आले आहेत. मात्र, बदलापूरकर याच ठिकाणी गाड्या पार्किंग करत असून, ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
एकीकडे शहरीकरण होत असताना शहरातील गर्दी वाढत आहे. दुसरीकडे वाहनांची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक नागरिक हे आपली वाहने घेऊनच बाजारात जातात. शहरात पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागात पालिकेचे वाहनतळ नसल्याने, तसेच खासगी वाहनतळात पैसे खर्च करून गाड्या पार्किंगमध्ये लावायला बदलापूरकर तयार नसल्‍याचे दिसते. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा गाड्या लावून बदलापूरकर बाजारहाट करत असतात. पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला असतो; त्यामुळे दोन्ही बाजूंनी शहरातील प्रत्येक नागरिक कोंडीत सापडतो. त्यात ‘नो पार्किंग’ फलकाखाली गाड्या पार्क करणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्यात येईल, अशी ताकीद पालिका व वाहतूक शाखेने दिलेली असतानाही, या ठिकाणी सर्रासपणे वाहने पार्किंग करण्यात येतात.