एक्स्प्रेसमध्ये विसरलेली ४४ तोळे दागिन्यांची बॅग परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्स्प्रेसमध्ये विसरलेली ४४ तोळे दागिन्यांची बॅग परत
एक्स्प्रेसमध्ये विसरलेली ४४ तोळे दागिन्यांची बॅग परत

एक्स्प्रेसमध्ये विसरलेली ४४ तोळे दागिन्यांची बॅग परत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : रेल्वे प्रवासादरम्यान एक प्रवासी तब्बल ४४ तोळ्यांचे दागिने असलेली बॅग विसरला होता. तो कल्याण स्थानकात उतरल्यावर त्याच्या ही बाब लक्षात आली. रेल्वे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने जलद गतीने तपास करत २४ तासांत बॅग घेऊन पसार झालेल्या इसमाचा गुजरातमध्ये शोध घेतला. त्याच्याकडून साडेतेवीस लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले.

हैदराबाद– मुंबई डेक्कन एक्स्प्रेसने कल्याणपर्यंत प्रवास करत असताना एका प्रवाशाची ४४ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने असलेली बॅग रेल्वेत राहिली होती. कल्याण स्थानकावर उतरल्यावर दागिने असलेली बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाणे, रेल्वे गुन्हे शाखा, एसटीएफ पथकाने बॅगेचा शोध सुरू केला. कल्याण, दादर, सीएसटी रेल्वे स्थानकावरील सीसी टीव्हीची पाहणी केली. दादर स्थानकावर एक इसम बॅग घेऊन जाताना आढळून आला. तो इसम गुजरातमधील अहमदाबाद येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. वरिष्ठांच्या आदेशान्वये विशेष कृती दलाच्या पथकाने अहमदाबादमध्ये जाऊन शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ बॅग आढळून आली. पोलिसांनी एकूण २३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग जप्त केली.