Wed, June 7, 2023

तलासरीतून मद्यसाठा जप्त
तलासरीतून मद्यसाठा जप्त
Published on : 8 February 2023, 12:28 pm
मनोर, ता. ८ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्यातील सूत्रकार-लुहारी रस्त्यावर दमण बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास केलेल्या कारवाईत कारमधून १०७ बल्क लिटर दारू साठ्यासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाईसाठी बुधवारी सकाळी तलासरी तालुक्यातील सूत्रकार-लुहारी रस्त्यावर नाकाबंदी केली होती. तेव्हा एका कारची तपासणी केली असता त्यात दमण बनावटीच्या विदेशी मद्याचे चौदा बॉक्स आढळून आले. कारचालक विजयभाई राजाभाई वाडिया (रा. पटेलपाडा-खराडपाडा, लुहारी, दादरानगर-हवेली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.