अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

मुंबादेवी, ता. ८ (बातमीदार) ः दक्षिण मुंबईतील पालिकेच्या बी विभागांतर्गत येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल मार्ग डोंगरी येथील रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या फूटपाथवरील जवळपास ५५ ते ६० अनधिकृत झोपड्या पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज बुधवारी (ता. ८) जमीनदोस्त केल्या.
बी विभागातील सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरील पालिका नियमानुसार पात्र झोपडपट्टीधारकांना स्थालांतरित करून उर्वरित अपात्र व अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले आहे, असे बी विभाग सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी या कारवाईसंदर्भात म्हटले आहे. त्यांच्याच नेतृत्वात ही कारवाई परिरक्षण खात्याचे सहायक अभियंता आणि अन्य खात्यातील ३० अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने केली.
या कारवाईत दोन जेसीबी, एक डम्पर यांच्यासह ही कारवाई सुरू असताना बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. डोंगरी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शबाना शेख यांच्या नेतृत्वात योग्य तो बंदोबस्त होता.

आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार शहानिशा करून अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. लोकांना चालण्यास आणि वाहनांच्या रहदारीस अडथळा येणारी अनधिकृत बांधकामे आणि झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील.
– धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त, बी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com