मुलीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत
मुलीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत

मुलीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ जात अनोळखी मुलीसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल अहमद गौस मोहम्मद राहिनी (वय२३) असे त्याचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित मुलीच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होते. त्यामुळे संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग झाले.
पीडित मुलगी सोमवारी (ता. ६) रात्री ९ वाजता हाजी अली येथून घरी जात होती. त्या वेळी एका कॅब कंपनीत काम करणाऱ्या चालकाने मुलीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. ते पाहून मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात करताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तपास केला असता चालकाने वाहन अंधेरी येथील कार्यालयात नेल्याचे समजले. त्याठिकाणी पोलिस रात्रभर उभे राहिले. सकाळी आरोपी कार्यालयात पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.