कार चालकाला लुटणारी टोळी जेरबंद

कार चालकाला लुटणारी टोळी जेरबंद

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : कारला ठोकर मारल्याचा बहाणा करून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील भाताण बोगद्याजवळ कारचालकाची लूटमार करत फरारी झालेल्या सहा लुटारूंना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली. या लुटारूंकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठाणे येथे राहणारे आजिनाथ राख हे गेल्या आठवड्यात पुणे येथे राहणाऱ्या आजारी भावाला पाहण्यासाठी मध्यरात्री कारने निघाले होते. भावाला देण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये घेतले होते. पहाटे अडीचच्या सुमारास ते भाताण बोगद्याजवळ आले असताना, कारमधून आलेल्या सहा जणांनी त्यांच्या कारला ओव्हरटेक करत त्यांची कार अडवली. त्यानंतर त्यांनी कारला ठोकर मारल्याचा बहाणा करून आजिनाथ यांना मारहाण करून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे नुकसानभरपाई मागण्यास सुरुवात केली. राख यांनी फोन करून पैसे मागवून घेत असल्याचे सांगितले, मात्र लुटारूंनी कारच्या डॅशबोर्डमधील दोन लाखांची रोख रक्कम लुटली आणि त्यांचा मोबाईल घेऊन पलायन केले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

सीसी टीव्हीच्या मदतीने शोध
गुन्हे प्रकटीकरण पथकाने मार्गावरील सीसी टीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. तसेच राख यांच्या वाहनाच्या मागे पुढे जाणाऱ्या कारचा नंबर मिळवला. टोल नाक्यावरील फास्टटॅग स्कॅनच्या मदतीने लुटारूंच्या कारचा नंबर मिळवला. त्यानंतर पोलिसांनी राजू आप्पा पुकळे (वय २५), प्रमोद श्रीमंत कोकरे (वय २८), मायाप्पा किसन वळकुंदे (२४), किरण महावीर सरगर (२८), अशोक तानाजी पाटील (२३), संदीप लवाजी कोकरे (२३) यांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com