वाड्यात पितृ पूजनाचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात पितृ पूजनाचा कार्यक्रम
वाड्यात पितृ पूजनाचा कार्यक्रम

वाड्यात पितृ पूजनाचा कार्यक्रम

sakal_logo
By

वाडा, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील पी. जे. हायस्कूल येथे बुधवारी पितृपूजन कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक बी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाने व योग वेदांत सेवा समिती मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते. याला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी आदर व प्रेमभाव निर्माण व्हावा, म्हणून शाळेत त्यांच्या आई-वडिलांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी पालकांचा त्यांच्या पाल्यांच्या हस्ते मानसन्मान करून गौरविण्यात आले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने विद्यार्थी व पालक भारावून गेले.