Fri, June 9, 2023

दंत चिकित्सा शिबिर
दंत चिकित्सा शिबिर
Published on : 9 February 2023, 11:40 am
धारावी, ता. ९ (बातमीदार) : संत कक्कया विकास संस्था संचालित श्री गणेश विद्यामंदिर शाळेत बुधवारी (ता. ८) स्वयंम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या वेळी अग्निसुरक्षाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ओएनजीसीचे एससी, एसटी असोसिएशनचे चेअरमन व वेल्फेअर ऑफिसर जोगेश सोमकुवर तसेच संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग रामा व्हटकर, सचिव राजेश खंदारे, स्वयंम डेंटल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अधिकारी शंकर खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.