भेट वस्तूंसह शुभेच्छांचा मुख्यमंत्र्यांवर वर्षाव

भेट वस्तूंसह शुभेच्छांचा मुख्यमंत्र्यांवर वर्षाव

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांवर छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांची प्रेमाने आणलेल्या भेटवस्तू दऊन त्यांनी केलेल्या शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस असल्याने शुभदीप बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहण्यास मिळाली. या वेळी शिंदे यांनी आपल्या किसननगर येथील जुन्या घराला भेट देत तेथील शाखेलाही भेट दिली.
गुरुवारी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्रीपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात येण्यापूर्वी दिवंगत आनंद दिघे यांना शक्तिस्थळावर जाऊन अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे महापालिकेपासून, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनामार्फत महाआरोग्य आणि महारक्तदान, लसीकरण आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते सव्वा किलोचा कंदी पेढ्याचा हार घेऊन आले होते; तसेच दुसरीकडे नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी खारीक खोबऱ्याचा हार भेट म्हणून आणला होता. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून हा २१ किलोचा हार बनवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थानी येऊन वाढदिवसाचे अभीष्टचिंतन केले. या वेळी भाजप आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते.

......................................
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
स्वयम् दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील दिवंगत गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावून दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. या वेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् ॲपचे अनावरण, स्वयंमच्या झेप या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयंम ॲपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. या वेळी स्वयंमच्या संस्थापक डॉ. नीता देवळालकर या उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com