पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून १४६ कोटींची दंडवसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून
१४६ कोटींची दंडवसुली
पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून १४६ कोटींची दंडवसुली

पश्चिम रेल्वेची फुकट्यांकडून १४६ कोटींची दंडवसुली

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : पश्चिम रेल्वेच्या लोकल रेल्वेमार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असताना फुकट्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाकडून नियमित कारवाई केली जाते. त्यानुसार पश्चिम रेल्वेने गेल्या दहा महिन्यांत २१.८३ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १४६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी लोकल, तसेच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून नियमित तिकीट तपासणी केली जाते. एप्रिल ते जानेवारी २०२३ या कालावधीत विनातिकीट तथा अनारक्षित २१.८३ लाख प्रकरणे आढळून आली. हेच प्रमाण मागील वर्षी १३ लाख होते. त्यानुसार पश्चिम रेल्वेने गेल्या दहा महिन्यांत २१.८३ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १४६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यातही जानेवारी महिन्यात १.७० लाख विनातिकीट प्रवाशांकडून १०.४६ कोटींचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.