Sat, June 10, 2023

बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्यास अटक
बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्यास अटक
Published on : 9 February 2023, 6:00 am
भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील कोन गावात रिद्धी-सिद्धी इंटरप्राईसचे अटलांटिका इमारतीचे बांधकाम सुरू असताना या ठिकाणी काम पाहणारे व्यवस्थापक रमेश वालेचा यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. शशिकांत बळीराम म्हात्रे (वय ५५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आपल्यासोबत तीन जणांना घेऊन इमारत बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. त्याने व्यवस्थापक रमेश वालेच्या यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून आरडाओरड करीत ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच कार्यालयाच्या काचा फोडण्याची धमकी दिली, अशी तक्रार वालेचा यांनी कोनगाव पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष बोराटे हे करीत आहेत.