मध्य, हार्बर मार्गावर
रविवारी मेगाब्लॉक

मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ता. १० : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची कामे करण्यासाठी रविवारी (ता. १२) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : विद्याविहार ते ठाणे पाचवी-सहावी मार्गिकेवर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान एलटीटी येथे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्याने १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच एलटीटी येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई येथून पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप- डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com