मंदिरातून चोरी करणारा अटकेत

मंदिरातून चोरी करणारा अटकेत

डोंबिवली, ता. १० : ठाकुर्ली येथील ९० फूट रोडवरील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात चोरीची घटना घडली. चोरट्याने देवाला नमस्कार केल्यानंतर मंदिरातील पितळेच्या वस्तू चोरून नेल्या. नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंदिरातील सीसी टीव्हीमध्ये ही चोरीची घटना कैद झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. गावदेवी मंदिरात बुधवारी (ता. ८) दुपारच्या सुमारास चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. तेथील मोठी समई चोरण्याचा प्रयत्न केला; परंतु ती त्याला चोरता आली नाही. अखेर त्याने देवीच्या समोरील छोटे दिवे आणि त्रिशूल चोरला. गेल्या वर्षीही या मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com