सोन्याच्या दातामुळे आरोपी अटकेत

सोन्याच्या दातामुळे आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : ४० हजार रुपयांची चोरी केल्याच्या प्रकरणात गेल्या पंधरा वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. आरोपीची ओळख पटवण्यात त्याचे सोन्याचे दोन दात उपयोगी पडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव प्रवीण जडेजा (३८) असून तो मूळचा गुजरातचा रहिवासी आहे.

प्रवीण जडेजा हा मुंबईतील एका कापड व्यावसायिकाकडे विक्रेता म्हणून काम करत होता. एका दुकानदाराकडे थकित असलेले ४० हजार रुपये आणण्यासाठी व्यावसायिकाने प्रवीणला पाठवले होते. हे पैसे घेऊन येताना आपल्याला चोराने लुटल्याचे प्रवीणने सांगितले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रवीणने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याला अटक झाली होती. त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र, तो न्यायालयातील तारखांना गैरहजर राहू लागला. अखेर न्यायालयाने त्याला फरारा घोषित केले होते.
इतक्या वर्षांनंतर प्रवीण गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याला त्याची पॉलिसी मॅच्युअर झाल्याचे तसेच, पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावले. पैशांच्या लालसेपोटी प्रवीण मुंबईत येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला ओळखण्यासाठी त्याचे सोन्याचे दात उपयोगी पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com