Tue, May 30, 2023

विमानतळावर कोट्यवधीचे सोने, परदेशी चलन जप्त
विमानतळावर कोट्यवधीचे सोने, परदेशी चलन जप्त
Published on : 10 February 2023, 4:47 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने कोट्यवधी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले आहे. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी ही कारवाई झाली. या कारवाईत एका व्यक्तीकडून सुमारे २.८ किलो सोने जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे १.४४ कोटी रुपये एवढी आहे; तर दुसऱ्या कारवाईत सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून सुमारे ९० हजार अरब अमिराती दिरहाम आणि दुसऱ्या प्रवाशाकडून ९० हजार अमेरिकन डॉलर जप्त केले आहेत. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत अंदाजे ९२ लाख रुपये आहे.