Fri, June 9, 2023

वनपाल अविनाश सरगर यांचा सत्कार
वनपाल अविनाश सरगर यांचा सत्कार
Published on : 12 February 2023, 1:21 am
मनोर, ता. १२ (बातमीदार) : वन विभागाच्या मनोर वनपरिक्षेत्र हद्दीतील नांदगाव राउंडचे वनपाल अविनाश सरगर यांनी वनसंरक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, डहाणूच्या उपवनसंरक्षक एस. मधुमिथा, सहाय्यक वनसंरक्षक गजानन सानप उपस्थित होते.