प्रभादेवी महापालिका शाळेत संगणकीय वर्ग

प्रभादेवी महापालिका शाळेत संगणकीय वर्ग

प्रभादेवी, ता. १२ (बातमीदार) : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लहान वयापासूनच विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेत, यासाठी निओ स्माईल या समाजिक संस्थेने प्रभादेवी महापालिका शाळेला दहा संगणक भेट दिले आहेत. या संगणकीय वर्गखोलीचे शिक्षकांच्या उपास्थितीत अनावरण करण्यात आले.
समाजिक कार्यकर्ते राजेश घाग यांच्या प्रयत्नातून समाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या निओ स्माईल समाजिक संस्थेचे संस्थापक अमृतलाल राठी व सीता राठी यांच्या पुढाकाराने प्रभादेवी महापालिका शाळेला दहा संगणक संच भेट देण्यात आले. या वेळी शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक किरण पाटील, उद्योजक सुभाष सारंग, संगणक इंजिनियर राहुल पेटकर, निओ स्माईल संस्थेचे दीनानाथ तिवारी, सिमरन सिंग, तन्मय मुखर्जी आदी उपास्थित होते.
विजेची समस्या ओळखून अनेक खेडेगावात सौर ऊर्जा पॅनल उपलब्ध करून देणे, शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप, संगणक संचवाटप असे विविध उपक्रम निओ स्माईल संस्थेने राबविले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com