Sun, June 4, 2023

देवघर येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
देवघर येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
Published on : 12 February 2023, 7:46 am
वाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील देवघर येथील जिल्हा परिषद शाळेतील १९९०-९१ मध्ये पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले. या वेळी सर्वांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तो काळ अतिशय कठीण होता, रोजगाराची फारशी साधने नव्हती. त्यामुळे प्रत्येकाने हलाकिच्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आठवण अनेकांच्या मनोगतातून व्यक्त झाली. या कार्यक्रमासाठी निवृत्त शिक्षक का. टो. पाटील, गुरुनाथ पष्टे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई पाटील यांनी केले; तर आभार मनिषा पाटील यांनी मानले.