अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात रक्तदान शिबिर
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात रक्तदान शिबिर

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात रक्तदान शिबिर

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बा. य. ल. नायर रुग्णालय तथा लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे उद्‍घाटन केले व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके व उपप्राचार्या डॉ. जानकी सावगाव यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक, महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी दर्शवली. या शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी ११६ स्वेच्छार्थींनी नोंदणी केली; त्यापैकी ८२ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांच्यासह रासेयो स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.