Tue, June 6, 2023

निर्बीजीकरण केंद्र पुर्वरत करण्याची मागणी
निर्बीजीकरण केंद्र पुर्वरत करण्याची मागणी
Published on : 12 February 2023, 7:46 am
विरार, ता. ११ (बातमीदार) : महानगरपालिकेचे बंद असलेले श्वानांचे निर्बीजीकरण केंद्र लकरात लवकर पुर्वरत करा, अशी मागणी साई दुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन घरत यांनी माजी सभापती कन्हैया भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याकडे केली आहे. नायगाव पुर्वेमध्ये पाच महिन्याच्या आत दोन हजार भटक्या श्वानांची पिल्ले झाली आहेत. नायगाव पुर्वेमधील आरोग्य केंद्रात जवळपास रोज २५ लोकांना रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन द्यावे लागते. नायगाव स्टेशन वरून रात्री ११ नंतर लोक चालत येऊ शकत नाहीत. महानगरपालिकेने त्यांचे बंद ठेवलेले निर्बीजीकरण केंद्र पुर्वरत करावे, अशी मागणी अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आली आहे.