शहापुरात गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे स्वागत

शहापुरात गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे स्वागत

खर्डी, ता. ११ (बातमीदार) : परभणी येथून १७ जानेवार २०२२पासून तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थिकलश घेऊन निघालेल्या धम्मपदयात्रेचे शहापूर तालुक्यात आगमगन झाले. तालुक्यातील कसारा, खर्डी, आटगाव व शहापूर येथे आगमन झाल्यावर ठिकठिकाणी कार्पेट व फुलांच्या पाकळ्या पसरवत स्वागत करून अनुयायिंनी दर्शन घेतले.
परभणीहून प्रारंभ झालेली ही पदयात्रा १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील दादर भागातील चैत्यभूमीला पोहचणार आहे. विशेष म्हणजे या यात्रेत थायलंडमधील १०१ बौद्ध भिख्खू सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील गगन मलिक फाऊंडेशन इंडिया, भारतीय बौद्ध महासभा आणि युवा आश्रय फाऊंडेशनने भिख्खू संघाच्या मदतीने तथागत भगवान गौतम बुद्धांचा अस्थिकलश महाराष्ट्रातील जनतेला दर्शनासाठी उपलब्ध केला आहे. अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील विविध गावातील नागरिक व बौद्ध अनुयायींनी मोठी गर्दी केली होती. या वेळी कसारा ते शहापूर महामार्ग दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहापूर तालुक्यातील बौद्ध धर्मिय तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शनिवारी धम्म पदयात्रेच्या स्वागतासाठी शहापूर जवळील चेरपोली येथे खास व्यवस्था करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com