विद्यार्थिनींना मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे

विद्यार्थिनींना मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : सध्या देशात आणि राज्यात महिला सुरक्षिततेच्‍या प्रश्नावर ठोस कार्यवाही म्हणून शालेय जीवनात वावरत असताना विद्यार्थिनींना कोणत्याही परिस्थितीचा प्रखर विरोध करण्यासह त्याचा मुकाबला करता यावा, यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींना आत्म संरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थिनींना कोणत्याही परिस्‍थितीत आपले स्वरक्षण करता यावे. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा मुकाबला करता यावा. यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थिनींना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन, समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधील मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई स्वरक्षण प्रशिक्षण व जीवन कौशल प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्याच्‍या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शिक्षण विभागाकडून नेमण्यात आलेल्या स्कील ट्री कन्सल्टन्सीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्‍हा परिषदेच्या ६६५ शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्म संरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे.
.....................................
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे यासाठी विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याने ठाणे जिल्‍हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई स्वरक्षण प्रशिक्षण व जीवन कौशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com