अंधेरीत बेस्ट बसला; तर मुलुंडमध्ये हॉटेलला आग

अंधेरीत बेस्ट बसला; तर मुलुंडमध्ये हॉटेलला आग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शहरातील अंधेरी आणि मुलुंड परिसरात आगीच सत्र शनिवारी (ता. ११) पाहायला मिळाले. मात्र या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंधेरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील चकाला जंक्शन येथे शनिवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास बेस्टच्या बसला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बसमधून प्रवासी सुखरूप खाली उतरले. अग्निशमन दलाने १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली. आणखी एका घटनेत मुलुंड भागातील मुलुंड पश्चिम परिसरातील सेंट्रल बँकेजवळ काऊबॉय बार्बेक्यू हॉटेलमध्ये आग लागली. मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी ३.२० वाजण्याच्या सुमारास आग विझवण्यात आली. या घटनेतील तीन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com