अरुण जाधव ठरला सीएम चषक विजेता

अरुण जाधव ठरला सीएम चषक विजेता

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : बाळासाहेबांची शिवसेना आणि युवा सेना यांनी उल्हासनगरात आयोजित केलेली सीएम चषक २०२३ शरीरसौष्ठव स्पर्धा लक्षवेधी ठरली आहे. १२० स्पर्धकांची सात गटात विभागणी करण्यात आल्यावर त्यापैकी अरुण जाधव हे टायटल विनर ठरले असून त्यांना २५ हजार रुपये रोख पारितोषिकसह चषक प्रदान करण्यात आला आहे.
बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, युवा सेनेचे माजी पदाधिकारी धीरज ठाकूर, बाळा श्रीखंडे यांच्या पुढाकाराने लॉयन्स क्लबमध्ये सीएम चषक २०२३ या भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टायटल विनर अरुण जाधव तसेच विविध गटातील विजेत्यांना व स्पर्धकांना आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख रमेश चव्हाण, शहर संघटक नाना बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख प्रकाश सावकारे, उत्तर भारतीय शहर प्रमुख के. डी. तिवारी, उपशहरप्रमुख कलवंतसिंग (बिट्टू) सोहता, सुरेश सोनवणे, संदीप गायकवाड, कल्याण उपजिल्हा अधिकारी युवराज पाटील, माजी नगरसेवक, स्वप्नील बागुल, विकास पाटील, अंबरनाथचे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, विभागप्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे, विभाग संघटक बाजीराव लहाने, उपविभागप्रमुख राकेश चिकणे, विल्सन डिसोजा, तुषार बांदल, शाखाप्रमुख राजू लहाणे, केशव‌ ओवळेकर व यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com