वैद्यकीय आरोग्य सेवेसाठी महावीर जैन हॉस्पिटलचा गौरव

वैद्यकीय आरोग्य सेवेसाठी महावीर जैन हॉस्पिटलचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : श्री महावीर जैन हॉस्पिटलकडून दर महिन्याला भरविण्यात येणाऱ्या शिबिरांच्या रूपात दिल्या जाणाऱ्या असाधारण वैद्यकीय आरोग्य सेवेसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून हॉस्पिटलचा गौरव करण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी हॉस्पिटलचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अजित शाह यांना प्रशस्तीपत्र प्रदान केले.
ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये महावीर जैन हॉस्पिटलतर्फे नोव्हेंबर २०२२ पासून दर महिन्याला सर्वसाधारण शारीरिक स्वास्थ्य तपासण्यासाठीच्या सर्वसाधारण आरोग्य तपासण्या, त्वचारोग संसर्ग, नाक-कान-घसा (ईएनटी), नेत्रतपासणी शिबिरे भरविली जात आहेत. ज्यांत डॉक्टर्स आणि आरोग्यकर्मींच्या सहाय्याने रुग्णांना तपासणी निदान उपचारसुविधा पुरविल्या जात आहेत. या शिबिरांद्वारे कैद्यांच्या वैद्यकीय समस्यांकडे उत्तम प्रकारे लक्ष पुरविले जात आहे व त्यांची देखभाल घेतली गेली आहे. या गोष्टीची कारागृहाच्या अधिकारीवर्गाने दखल घेतली आहे. ही सर्व शिबिरे केवळ वैद्यकीय मूल्यमापन आणि उपचाराची दिशा दाखविण्यापुरतीच मर्यादित नव्हती. त्यांनी उपचारांसाठी लिहून देण्यात आलेली औषधेही यावेळी रुग्णांना पुरविण्यात आली. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारीवर्गाने महावीर जैन हॉस्पिटलचे वैद्यकीय सल्लागार, तंत्रज्ञ, परिचारक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, हॉस्पिटल व्यवस्थापन आणि विश्वस्त मंडळाचे कौतुक केले आहे.
..............
सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध
विश्वस्त संस्था शक्य त्या सर्व स्तरांतील मानवांना सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध असून यापुढेही संस्थेतर्फे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये मासिक तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, असे श्री महावीर जैन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त महेंद्र जैन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com