वाडा-तिळसेश्वर रस्त्याची प्रतीक्षा संपली

वाडा-तिळसेश्वर रस्त्याची प्रतीक्षा संपली

वाडा, ता. १२ (बातमीदार) : वाडा-खर्डी हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच रस्त्यावर असलेल्या तिळसेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरते. येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यात्रेकरूंचा प्रवास खडतर होण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र यात्रेपूर्वीच कामाला सुरुवात झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा वाडा-खर्डी हा एक महत्त्वाचा राज्य मार्ग असून गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच मार्गावर तिळसेश्वर येथे पांडवकालीन शिवशंभू महादेवाचे मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या भव्य यात्रेस ठाणे, पालघर जिल्ह्यातून लाखो भाविक येतात. यांच्यासाठी हा मार्ग यावेळी खडतर झाला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने दखल घेत शुक्रवारपासून (ता. १०) या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

-------------------
रस्त्याच्या मजबुतीसाठी स्थानिकांनी लक्ष द्यावे
वाडा-तिळसेश्वर-खर्डी या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला होता. मात्र आता रस्ते कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. तिळसेश्वर परिसरात २० ते २५ गावे असून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथील वाहनचालकांना दुचाकी चालवणेही मुश्कील झाले होते. आता रस्ता चांगला करून घेण्यासाठी स्थानिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन कुणबी सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी केले आहे.

----------------------
वाडा-तिळसेश्वर-खर्डी या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचेच होणार आणि तेही महाशिवरात्रीपूर्वीच पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
- अनिल भरसट, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com