पश्चिम रेल्वेवर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे धावणार

पश्चिम रेल्वेवर फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे धावणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस, सुरत-करमाळी आणि साबरमती-ओखा दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. या रेल्वे १६ फेब्रुवारी २०२३ पासून धावणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक ०९२०७ वांद्रे टर्मिनस-भावनगर ३ मार्च २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता भावनगरला पोहोचेल. त्याचप्रमाणे रेल्वे क्रमांक ०९२०८ भावनगर टर्मिनस-वांद्रे टर्मिनस स्पेशल २ मार्च २०२३ रोजी भावनगरहून दुपारी २.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता वांद्र्याला पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०९१९३ सुरत-करमाळी सुपरफास्ट स्पेशल सुरत येथून ७ मार्च २०२३ रोजी रात्री ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता करमाळी येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे रेल्वे क्रमांक ०९१९४ करमाळी-सुरत विशेष ८ मार्च २०२३ रोजी करमाळी येथून रात्री ८.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सुरतला पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०९४५३ साबरमती-ओखा सुपरफास्ट स्पेशल १६ फेब्रुवारी २०२३ रोजी साबरमतीहून रात्री ११.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२५ वाजता ओखा येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे रेल्वे क्रमांक ०९४५४ ओखा-साबरमती सुपरफास्ट स्पेशल १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ओखा येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३५ वाजता साबरमतीला पोहोचेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com