
जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमातशाळाबाह्य मुली चमकल्या
जव्हार, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत ‘सांस्कृतिक संध्या’ हा कार्यक्रम पालघर येथील दांडेकर महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जव्हार तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गोरठण या शाळेतील शाळाबाह्य मुलींनी ‘कोरोना वॉरियर्स’ थीम ठेवून उत्कृष्ट समुहनृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली. हे नृत्य आणि संकल्पना पाहताच पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व इतर पदाधिकारी व आधिकारी यांनी या शाळाबाह्य विद्यार्थिनींच्या कलेला दाद देत प्रोस्ताहन देऊन सत्कार केला. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मुकणे व इतर शिक्षकांनी कल्पकतेने हे समूहनृत्य मूर्त रूपात येण्यास प्रयत्न केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकाश निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वतः अध्यक्ष प्रकाश निकम व पदाधिकाऱ्यांनी तारपा नृत्यात सहभाग घेतला होता.