प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार
प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार

प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित करणार

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १३ (बातमीदार) : जुनी पेन्शन योजना लागू करण्‍यात येणार असून, त्‍याचबरोबर शिक्षक आमदार म्हणून शिक्षक, विद्यार्थी व शैक्षणिक संस्था यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याची ग्‍वाही कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जीवनदीप कॉलेजमध्ये आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी दिली.
यावेळी स्थानिक आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, रवींद्र घोडविंदे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण व्यवस्थेतील बारकावे आणि बदलांविषयी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करून प्रभावी शिक्षण व्यवस्था तयार करण्याचा आपला मानस असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यापासून निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न विशद करत शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा यासाठी शिक्षकांनी केलेल्‍या सहकार्याबद्दल उपस्थित शिक्षकांना धन्यवाद दिले. निरंजन डावखरे यांनी शिक्षक समाज परिवर्तनाचा मुख्य घटक असल्याचे सांगत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात मोलाचे आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने शैक्षणिक संस्थांचा व शिक्षकांना जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
-----------------------------------
२३ शिक्षकांचा गौरव
शिक्षक रत्न पुरस्कारासाठी शंभरहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील २३ शिक्षकांची शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये सिद्धप्पा शिंदे, प्रमिला पवार, शलाका नागवेकर, अर्जुन माचिवले, रामराव पवार, आडेप किसनराव, दीप्ती यादव, ज्योती सानये, ललिता मोरे, दत्ता लोणारे, वैशाली रोहणे, सुप्रिया नायकर, वैभवी तरटे, अर्चना मोहिते, कल्पेश शिंदे, रतिलाल बाबेल, दीनानाथ पाटील, यशवंत महाजन, सुभाष यादव सरोदे, प्रशांत माळी, आनंद मेहेर, हेमंत झुंझारराव, अजय जिरापुरे यांना शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.