हद्दपार आरोपीला पुन्हा अटक

हद्दपार आरोपीला पुन्हा अटक

नवी मुंबई (वार्ताहर): दोन वर्षांसाठी हद्दपार केले असतानादेखील पुन्हा हद्दीत दाखल झालेल्या एकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. विजय पवार (३३) असे या आरोपीचे नाव असून खारघरमधील ओवेगावातून त्याला अटक केली आहे.
पनवेल तालुक्यातील वावंजे गावात राहणाऱ्या विजय पवारला परिमंडळ-२ च्या पोलिस उपआयुक्तांनी जुलै २०२२ मध्ये नवी मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. या आदेशानंतर विजय पवारला हद्दीबाहेर सोडून देण्यात आले होते. मात्र ५ फेब्रुवारी रोजी तो खारघरमधील ओवेगाव येथे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दाखल केला होता. याबाबतची माहिती खारघर पोलिसांना मिळाल्यानंतर विजय पवार याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. तसेच पोलिस उप-आयुक्तांच्या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com