कौलाळेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौलाळेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
कौलाळेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

कौलाळेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

sakal_logo
By

जव्हार, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यातील जिल्हा परिषद गट कौलाळे, झाप व नांदगाव येथे एकदिवशीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन रविवारी (ता. १२) करण्यात आले होते. झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी स्पर्धेचे उद्‍घाटन करून शर्यतीला सुरुवात केली.
राज्यात बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा विषय आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत होत आहेत. मधल्या काळात बैलाचा छळ होतो म्हणून त्यावर न्यायालयाने बंदी घातली. तसेच बैलांवरील लम्पी वायरसमुळेदेखील हा खेळ थांबवला होता; परंतु तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी यांची परवानगी घेऊन शर्यतीचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली. या स्पर्धेतील बहुतेक स्पर्धक हे नाशिक जिल्ह्यातून दाखल झाले होते.

-----------------------
शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी
पहिली शर्यत ही २ वा. २० मिनीटांनी पार पडली. यात मोखाडा तालुक्यातील मडक्याची मेट यांच्या बैलजोडीने ३०० मीटर अंतर २९ सेकंदामधे कापत विजय साजरा केला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत हा खेळ चालूच होतो. जवळपास शंभरच्या आसपास स्पर्धक सहभागी झाले होते. तसेच हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. या स्पर्धेत नांदगाव येथील नारायण करणोर, नरेश लोणे, तुकाराम बाजगीर, मनोज वाघमोडे यांनी विशेष सहकार्य करून पंचांची भूमिका पार पाडली.