Tue, June 6, 2023

चाकूने तरुणावर प्राणघातक हल्ला
चाकूने तरुणावर प्राणघातक हल्ला
Published on : 13 February 2023, 3:42 am
ठाणे, ता. १३ (वार्ताहर) : चुलत भावाला त्रास देऊ नका, असा सांगितल्याने दोन इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला करत तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात राकेश राजेंद्रप्रसाद शर्मा याच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश राजेंद्रप्रसाद शर्मा (वय २८, रा. आझादनगर) याने राजेश जाधव ऊर्फ नॅनो, इस्मानुल जोसेफ नाडर यांना त्याचा चुलत भाऊ महादेव शर्मा याला त्रास देऊ नका, असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी राकेश याच्या पोटावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कापूरबावडी पोलिस ठाण्यात आरोपी राजेश आणि इस्मानुल यांच्याविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पसार आरोपींचा शोध घेत आहेत.