Sun, June 4, 2023

पालघर जिल्ह्यात तीन मनाई आदेश जारी
पालघर जिल्ह्यात तीन मनाई आदेश जारी
Published on : 13 February 2023, 3:48 am
पालघर, ता. १३ (बातमीदार) : पालघर अप्पर जिल्हाधिकारी यांनी आज (ता. १३) तीन विविध मनाई आदेश लागू केले आहेत. वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस दोन किलोमीटर कार्यक्षेत्रात २३ फेब्रुवारीपासून २२ एप्रिलपर्यंत शासकीय विभाग वगळून अन्य व्यक्तींना वापर करण्यास मनाई करण्यात आली. तसेच तारापूर अणू विद्युत केंद्राच्या सभोवताली दोन किलोमीटर परिसरात ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने यांचा वापर करण्यास १३ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक यांचे कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ फेब्रुवारीपर्यंत राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य, भाषण, विडंबन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे तिन्ही मनाई आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर किरण महाजन यांनी जाहीर केले आहेत.