मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उल्हासनगरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उल्हासनगरात

उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी उल्हासनगरात येत असून त्यांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी दिली. पॉवर स्वीपिंग मशीन, स्ट्रीट लाईट मशीन, सक्शन मशीन आदी वाहने, व्हर्च्युअल पद्धतीने महानगरपालिकेच्या जवळ श्वान निर्बिजीकरण केंद्र, शासकीय विद्युत वाहनांसाठी लागणारे चार्जिंग स्टेशन, खेडेगोळवली येथील मलनिस्सारण केंद्र या प्रकल्पांचे लोकार्पण आणि दिव्यांग व्यक्तींच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे व रिजेन्सी निर्माणने दिलेल्या प्‍लास्टिक क्रशर मशीनचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, रमेश पाटील उपस्थित राहणार असल्याचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.
दरम्यान, सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा ही डॉल्फिन क्लब समोरील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानात होणार आहे. त्याची पाहणी आयुक्त अजीज शेख, पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, डॉ. करुणा जुईकर, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केली. बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर-महाराज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com