वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली

वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : तीन तालुकास्तरावर आयोजित केलेल्‍या राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी ३८८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी एक कोटी २७ लाख रुपयांचा भरणा केला.
कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती.

१. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात ४२ ग्राहकांनी ३४ लाख सहा हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला.
२. कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातील ७१ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या २१८ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.
३. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील ३४ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत १७ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केला.
४. पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ९४ ग्राहकांनी तीन लाख ९३ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com