ज्ञानसागर विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानसागर विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
ज्ञानसागर विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

ज्ञानसागर विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः जोगेश्वरी पश्चिम येथील ज्ञानसागर सोसायटी संचालित कैलासवासी वसंतराव शिंदे संस्थापक असलेल्या ज्ञानसागर विद्यालय या शाळेत दहावी व १९९९ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष दिनेश वसंतराव शिंदे, सचिव प्रल्हाद सदाशिव शिंदे, खजिनदार रोहिणी दिनेश शिंदे व शाळेचे मुख्याध्यापक संजय संतोष मोरे व पर्यवेक्षिका सुवर्णा सुरेश चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू सुधाकर सावंत यांनी केले, तसेच प्राथमिक विभागातून रणजीत भोसले व सायली कुडकर उपस्थित होत्या. विद्यार्थी मॉनिटर विश्वनाथ बेडेकर व क्रांती जाधव यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनीही या वेळी हजेरी लावली. सुवर्णा चव्हाण व सायली कुडकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी आभार मानले.