विरार रनमधून देणार मानसिक स्वास्थ्याचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार रनमधून देणार मानसिक स्वास्थ्याचा संदेश
विरार रनमधून देणार मानसिक स्वास्थ्याचा संदेश

विरार रनमधून देणार मानसिक स्वास्थ्याचा संदेश

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. येथील खेळाडूंसह नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी व मानसिक स्वास्था यासह विविध समाजपयोगी संदेश देता यावे म्हणून विरार रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन येत्या रविवारी (ता. १९ ) करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक व आयोजक हार्दिक राऊत व खेळाडू पट्टू ग्रीष्म पाटील यांनी दिली. या स्पर्धेत बक्षिसांसह प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.
विरार रनची माहिती देण्यासाठी अमेय क्लासिक क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक हार्दिक राऊत, ग्रीष्मा पाटील, माजी सभापती सखाराम महाडिक, डॉ अरुण गोयल, प्रवीण क्षीरसागर आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील १० किमीची दौड विरार पश्चिम अमेय क्लासिक क्लब येथून सुरुवात होणार असून विराट नगर, जकात नाका, म्हाडा वसाहत करत अमेल क्लासिक क्लब येथे त्याची सांगता होणार आहे. यावेळी एशियन युथ गेम्समध्ये तिसरे स्थान पटकवणारी आणि खेलो इंडियतील सुवर्ण पदक विजेती इशा जाधव खेळाडूंचे प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहे.
विरार रन १० ते १२, १४ ते १६ या वयोगटांसाठी असणार आहे. मुलींसाठी व मुलांसाठी वेग वेगळी दौड आयोजित करण्यात आली आहे. यात ३, १.५ किलोमीटर आणि १ किलोमीटरची दौड ही विना शुल्क ठेवण्यात आली आहे. विरार रनमधील फन रन मध्ये अमली पदार्थ सेवनास बंदी, ट्रान्सजेंडर कम्युनिटी, निसर्ग संरक्षण यासह विविध संदेश देण्यात येणार आहेत.
-------------
वसई : विरार रनबाबत ग्रीष्मा पाटील, हार्दिक राऊत यांनी माहिती दिली.