पेट्रोल भरायला गेले अन् ट्रकखाली सापडले, १०० मीटर फरफटत नेल्याने तिघांचा मृत्यू

पेट्रोल भरायला गेले अन् ट्रकखाली सापडले, १०० मीटर फरफटत नेल्याने तिघांचा मृत्यू

महेंद्र पवार, कासा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी सकाळी चारोटीतील एशियन पेट्रोल पंपासमोरील ब्लॅक स्पॉटजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकने दुचाकीला तब्बल १०० फुटांपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून या अपघातानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केलंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक करतायंत.

Mumbai Ahmedabad High Way Accident

पेट्रोल भरायला गेले अन् ट्रकखाली सापडले, १०० मीटर फरफटत नेल्याने तिघांचा मृत्यू
वैयक्तिक अपघात विमा : एक अपरिचित सुहृद

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते अच्छाड हा १३० किमी अंतराचा पट्टा अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. मंगळवारी सकाळी एशियन पेट्रोलपंपासमोरील ब्लॅक स्पॉट (अपघात होण्याची शक्यता असलेला पट्टा) असलेल्या क्रॉसिंगवर दुचाकीस्वार रस्ता ओलांडून पेट्रोल भरण्यासाठी जात होता. यादरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.  

ट्रकने तब्बल १०० मीटरपर्यंत दुचाकीला फरफटत नेले. यात दुचाकीवरील काकड्या रांधे (वय ४४ वर्षे), स्वप्नील रांधे (वय २४ वर्षे) आणि विष्णू (वय २८ वर्षे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही तलासरी तालुक्यातील सुत्रकार येथील राहणारे आहेत. या अपघातप्रकरणी कासा पोलिसांनी ट्रक चालकास अटक केलीये.

अपघातासाठी जबाबदार कोण?

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने सुरक्षित उपाययोजना केल्या नसल्यामुळे तसेच अनेक कामे अर्धवट ठेवल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे स्थानिक सांगतात. काही महिन्यांपूर्वी उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा देखील याच महामार्गावर अपघाती मृत्यू झाला होता. 

पेट्रोल भरायला गेले अन् ट्रकखाली सापडले, १०० मीटर फरफटत नेल्याने तिघांचा मृत्यू
वारिशेंचा अपघात नव्हे, घात!

पेट्रोल पंपासमोरील ‘ब्लॅक स्पॉट’

चारोटीजवळील एशियन पेट्रोलपंपावर जाण्यासाठी अनधिकृत क्रॉसिंगचे ठिकाण हे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास ५० हून अधिक जणांना अपघातात  प्राण गमवावे लागले आहे. चारोटी नाका येथून पेट्रोलपंपावर इंधन भरायला जाण्यासाठी असलेल्या सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे वाहनचालकांना नाईलाजाने धोकादायक क्रॉसिंग ओलांडून अथवा विरुद्ध दिशेने वाहने चालवावी लागतात. चारोटी नाका येथून उड्डाणपूलाचा आणि महालक्ष्मी बाजूने असलेला तीव्र उतार हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे.या ठिकाणी सर्विस रोड आणि अंडरपास बनविण्यासाठी चारोटी ग्रामपंचायत यांच्याकडून वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com