Sat, March 25, 2023

बॉम्बच्या धमकीने पोलिस सतर्क
बॉम्बच्या धमकीने पोलिस सतर्क
Published on : 14 February 2023, 11:58 am
भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी आल्याची बाब गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तालयाकडून शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईच्या सह पोलिस आयुक्तांना मिरा भाईंदर शहरात बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्याची माहिती मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तांना देण्यात आल्यानंतर पोलिस सतर्क झाले. पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी सोमवारी शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणे, मॉल, जास्त गर्दी होणारे बाजार, मल्टीप्लेक्स आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार जागोजागी पोलिस नियुक्त करण्यात आले होते. रस्त्यावरही ठिकठिकाणी नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात होती.