उद्यानाबाहेर दम मारो दम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यानाबाहेर दम मारो दम
उद्यानाबाहेर दम मारो दम

उद्यानाबाहेर दम मारो दम

sakal_logo
By

घणसोली, ता. १५ (बातमीदार)ः घणसोली सेंट्रल पार्कच्या बाहेर नागरिकांना फिरण्यासाठी मॉर्निंग वॉक करण्यासाठी महापालिकेच्या मार्फत जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी गांजा, दारू आणि खुलेआम नशा करण्यात येत आहे. त्यामुळे सेंट्रल पार्क परिसरातील या प्रकारांना आळा घालण्याची मागणी महिलांसह ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.
घणसोलीतील नागरिकांसाठी विरंगुळ्यासाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात सध्या गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे चित्र आहे. घणसोली सेंट्रल पार्कच्या बाहेर असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरील नागरिकांना बसण्यासाठी महापालिकेने बांधलेले कट्टे गर्दुल्ल्यांच्या मैफली रंगत आहेत; तर अनेकदा रात्री आणि पहाटे मद्यपी उघड्यावरच मद्यप्राशन करत आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी उभारलेल्या या जॉगिंग ट्रॅकवर आता नागरिकांना जाणे देखील भीतीदायक वाटत आहे. तसेच याठिकाणी सिगारेट पिणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने ज्येष्ठांसह महिलावर्गाने या ट्रॅककडे पाठ फिरवली आहे.
------------------------------------
लहान मुलांवर विपरीत परिणाम
महापालिकेच्या माध्यमातून घणसोलीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे विरंगुळा केंद्र देखील उभारण्यात आले आहे. लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, मद्य किंवा नशा केला जात असल्याने त्याचा परिणाम लहान मुलांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नशेखोरांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
़़़़़़ः------------------------------------
घणसोली विभागातील सेंट्रल पार्कबाहेर नशा करणाऱ्यांचा वावर वाढल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. अशा नशेखोरांवर कारवाई होईल.
- अजय भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे
-----------------------------------
घणसोली सेंट्रल पार्क हे सार्वजनिक ठिकाण असून याठिकाणी हजारो नागरिकांची दररोज रेलचेल असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांवर आळा घालणे गरजेचे आहे.
- दर्शना पाटील, नागरिक