वर्तक महाविद्यालयात स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्तक महाविद्यालयात स्वच्छता अभियान
वर्तक महाविद्यालयात स्वच्छता अभियान

वर्तक महाविद्यालयात स्वच्छता अभियान

sakal_logo
By

विरार, ता. १४ (बातमीदार) : १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून तरुणाईकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण वसई येथील विद्यावर्धिनी शिक्षणसंस्था संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात स्वच्छता अभियानासह विविध उपक्रम राबवत अभिनव पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद उबाळे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात प्रामुख्याने महाविद्यालय परिसरातील इतर स्वतः पसरलेला प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमात गोळा करण्यात आलेला सेंद्रिय कचरा खतनिर्मिती प्रक्रियेत वापरण्यात आला.
सर्वत्र व्हॅलेंटाईन डे तसेच तत्सम विविध दिवस साजरे करण्यामधून भावनांचे व्यापारीकरण होत असताना अशा प्रकारचा उपक्रमांमधून एक प्रकारे बाजारकेंद्री विचारसरणीला सक्रियपणे विरोध करत असल्याची भावना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ शत्रुघ्न फड यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधीस्वीकृती परिषदेमार्फत (एनएएसी) लवकरच महाविद्यालयाचे मानांकन केले जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन काम करण्यामधून महाविद्यालयामधील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरावरील आपले प्रेम व्यक्त केले. अशाप्रकारे एकत्र येऊन श्रमदान करण्यामधून सर्वांमधील स्नेहबंध दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी व्यक्त केली.